Breaking

गिरणारे येथे कोव्हीड केअर सेंटर सुरु


गिरगारे (नाशिक) : गिरणारे येथील के. बी. एच. हायस्कुल मध्ये कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले. गारणारे व परिसरातील नागरिकांना होम कॉरंटाईन होण्यासाठी सुविधा नसेल, त्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवहान करण्यात आले आहे. 


नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा खालीलप्रमाणे :
 
●  24 तास डाॅक्टरांची उपस्थिती
● झोपण्यासाठी बेड व गादी
● पिण्यासाठी शुद्ध पाणी
● ज्यांना जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था नसेल त्यांच्या साठी नाष्ट्याची व जेवणाची मोफत व्यवस्था
● आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था
● पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
● सकाळ संध्याकाळ नाष्ट्यासाठी अंड्यांची मोफत व्यवस्था

कोव्हीड केअर सेंटरसाठी शरद थेटे, अविनाश पाटिल, मनोज थेटे, मनोज बाविस्कर, राम वाकचौरे, दत्तु ढगे, रमेश अय्यर, तसेच सर्व डाॅक्टर्स के. बी. एच. हायस्कुल तसेच गिरणारे ग्रामस्थांंचे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा