Breaking

कोल्हापूर : असंघटित कामगार-वंचित घर कामगार यानां तात्काळ मदत करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी


कोल्हापूर असंघटित कामगार-वंचित घर कामगार यांंना तात्काळ मदत करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे केली आहे.


आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डॉ. सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माकपचे जिल्हा सेक्रेटरी काॅ. प्राचार्य ए. बी. पाटील, भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, विकास पाटील, दत्ता माने, शंकर काटाळे, मुमताज हैदर, राजेश वरक, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, आण्णासो रड्डे, नारायण गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी शासनाने तात्काळ बेडस, व्हेंटिलेटर, औषधे, ऑक्सिजन पुरवठा पुरेसा होईल यासाठी प्रशासन सक्रिय करून अमंलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली.

कामगारांच्या काही घटकाला कांहीं प्रमाणात मदत जाहीर केली आहे, ती अपुरी असल्याने त्यामध्ये वाढ करावी. असंघटित क्षेत्रातील यंत्रमाग, सायझिंग, इंजिनिअरिंग आणि इतर काही विभागाला अद्याप कोणतीही मदत जाहीर केली नाही. ऊसतोड कामगार यांनाही मदत गरजेची आहे. सर्वच कामगार वर्गाच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जगण्याचा प्रश्न तयार झाल्यामुळे, सर्वच असंघटित कामगारांसाठी किमान ७५०० रुपये मदत जाहीर करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच घर कामगारांमध्ये अशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे बहुतांश कामगांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष घरकाम करणाऱ्या सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळावा. मोफत धान्य वितरण व्यवस्थेमध्ये केसरी कार्ड धारकांचा समावेश करण्यात यावा, या सुध्दा मागण्या करण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा