Breaking


जुन्नर तालुक्यात १०८ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १०८ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.


यामध्ये जुन्नर पिंपरी पेंढार १, घाटघर १, बाराव १, शिंदेवाडी १, गुंजाळवाडी बेल्हे १, बेल्हे १, पेमदारा ३, शिवली १, मढ ४, पारगाव तर्फे आळे २, ओतूर १०, डुंबरवाडी १, आंबेगाव्हाण २, बल्लालावडी १, उदापूर २, पिंपळवंडी ६, कोळवाडी १, राजुरी ७, बोरी बु २, उंचखडक २, शिरोली बुद्रुक ४, हापूस बाग २, गोळेगाव १, काचळवाडी ३, लेण्याद्री १, कुरण १, पिंपळगाव आर्वी १, वडगाव सहानी १, गुंजाळवाडी आर्वी १, धामणखेल १, भोरवाडी (हिवरे बुद्रुक) ५, ढालेवाडी १, ओझर ३, येडगाव १, नारायणगाव ८, हिवरे तर्फे  नारायणगाव १, खोदाड १, वारुळवाडी २, येणेरे ७, चिंचोली २, निमदारी २, पारुंडे १, वडज २, जुन्नर नगरपालिका ५ यांचा समावेश आहे. 

तर मागील २४ तासात हिवरे तर्फे नारायणगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, तर वारुळवाडी येथील ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात होतोय शिरकाव

जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी स्वत: काळजी घेणे हाच उपाय आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा