Breaking
मोठी बातमी : इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार


मुंबई : राज्यातील कोरोनाची उद्भवलेली परिस्थिती पाहता शालेय शिक्षण विभागाने इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा