Breakingछत्तीसगड : नक्षलवाद्यांच्या चकमकीत २२ जवान शहीद तर काही जवान बेपत्ता


विजापूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान ५ जवान शहीद झाले होते तर चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आले होते त्यानंतर पुन्हा २ जवानांचं पार्थिव सापडलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 


केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम नक्षलविरोधी कारवाईसाठी शुक्रवारी रात्री रवाना झाली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत जखमी झालेल्या २३ जवानांना विजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर ७ जवानांना रायपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.


मात्र आता धक्कादायक माहिती पुढे येत असून चकमकीत २२ जवान शहीद झाले आहेत तर अजून काही बेपत्ता आहेत. तर घटनास्थळी अजून ही जवानांचे मृतदेह पडून असल्याची माहिती आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा