Breaking




जुन्नर तालुक्यातील एका २८ वर्षीय आदिवासी युवकाचा वीज पडून मृत्यू


जुन्नर : तालुक्यातील काही भागात आज वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. त्यावेळी आदिवासी भागातील बोतार्डे गावातील एका व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाला.

बोतार्डे गावच्या आमलेवाडी येथील विकास सखाराम केदार (वय २८) असे व्यक्तीचे नाव आहे. केदार हे बेलसर येथे निम्म्या वाट्याने शेती करत होते. पावसाचे वातावरण झाल्याने ते शेतात कांदे झाकण्यासाठी गेले असता त्यांच्यावर शेतातच वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा