Breaking

आदिवासी खावटी योजनेपासून अजूनही वंचित, 6 हजार रूपये बँक खात्यात जमा करा : सुशिलकुमार पावरा


रत्नागिरी : राज्यातील ११ लाख ५५ हजार गरीब आदिवासी बांधवांना तात्काळ खावटी योजनेचे मागील 4 हजार व आताचे जाहीर करण्यात आलेले 2 हजार असे एकूण 6 हजार रूपये लाभार्थीच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आदिवासी विकास मंञी अॅड. के.सी.पाडवी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आदिवासींना तात्काळ खावटी वाटप करा. अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी वृत्तपञातील बातम्यांच्या आधारे खावटीचा प्रश्न मांडत सरकारला धारेवर धरले होते. काही आदिवासी आमदारांनीही हा विषय विधानसभेत मांडला होता. सरकारवर या विषयाबाबत प्रचंड दबाव निर्माण झाला होता. अखेर आर्थिक वर्ष सरायला फक्त 5 दिवस शिल्लक असताना म्हणजे दिनांक 26 मार्च 2021 रोजी आदिवासी विकास विभागाने आदिवासी खावटी वाटपातील निधी वितरित करण्याचा शासन निर्णय काढला. यात 2000 रुपये रोख लाभार्थीच्या बॅन्क खात्यात ऑनलाईन वितरित करावे व 2000 रुपयांची वस्तू स्वरूपात देण्यात यावे, असे नमूद केले आहे. या योजनेसाठी 231 कोटी रूपये निधी वितरित करण्याचे निर्देश नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त आदिवासी विकास , महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे. 

माञ आर्थिक वर्ष संपल्यानंतर उर्वरित 2000 रूपये वस्तू स्वरूपात मिळतील किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. ही योजना फक्त कागदावरच राहील, असे घडताना दिसत आहे. कारण पहिल्या लाकडाऊन कालावधीत जाहीर झालेली खावटी अजूनही आदिवासी बांधवांना अद्याप  देण्यात आली नाही. दुसरे लाकडाऊन सुरू झाले आहे व सरकारने पुन्हा प्रत्येक लाभार्थीस 2 हजार रूपये खावटीसाठी जाहीर केले आहेत  तरी खावटी योजनेचा निधी व वस्तू लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा