Breaking

जिंकलंस भावा : जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणारा रेल्वे कर्मचारी बक्षिसातील निम्मी रक्कम अंध आईला देण्याचा निर्णय


मुंबई : मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात अंध आईचा हात सुटून रेल्वे रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा समोरून जलद वेगाने येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून पॉईंटमन मयूर शेळके यांनी त्याचा जीव वाचवला होता.


या घटनेनंतर काही तासातच या घटनेचा व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल झाला. मयूर शेळके यांच्या या धाडसी कृतीबाबत मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री, महापौरांसह सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे. रेल्वेकडून या घटनेची दखल घेत त्यांना पन्नास हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. हे बक्षीस जाहीर झाल्यानंतर त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. शौर्य गाजवून मनं जिंकणाऱ्या मयुर यांनी आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवल आहे.


दरम्यान, जावा कंपनीने सुद्धा यांच्या धाडसाचे कौतुक करत एक गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे, जावा कंपनीकडून मयुर शेळकेला एक जावा मोटार सायकल देऊन गौरव करण्यात येत आहे, असं ट्विट जावा कपंनीचे अनुपम थरेजा यांनी केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा