Breaking

आंबेगाव : युवकांनी मनाची भिती घालणे गरजेची - प्रा. हनुमंत भवारी


घोडेगाव (आंबेगाव) : कोरोनाची महामारी आणि बेरोजगारीच्या संकटात तरुणांनी मनाची भिती घालणे गरजेची आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांनी केले.


ते युवा एकता टीम, पुणे आयोजित युवा एकता व्याख्यानमालेत सद्याच्या परिस्थितीत युवकांनी नक्की करायचं काय ? या विषयावर बोलत होते.

पुढे बोलताना प्रा. भवारी म्हणाले, "अशा परिस्थितीत आपली मतं ठाम करावी लागतील. स्वतःच्या मतांवर ठाम राहून स्वतः प्रती आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी याचा विचार करावा लागेल. स्वतः च्या कमतरता, उणीवा भरुन काढण्याची गरज आहे. व्यक्तिमत्त्व विकास साधणे गरजेचा आहे."

सध्याच्या कठीण परिस्थितीत विद्यार्थी, युवक-युवती या अनेक संकटांना सामोरा जात आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभर विद्यार्थी शिक्षणापासून दुर आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये पोलिस भरती, तलाठी भरती व इतर पदभरती परीक्षा न झाल्याने असंतोष आहे. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न अधिकच बळावला आहे. एकूणच सारा कष्टकरी सर्वहारा वर्ग शोषणाच्या गर्तेत अडकला आहे. अशा परिस्थितीत आपण सारे आपापल्या परीने वाटा शोधत आहोत. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. म्हणून युवा एकता व्याख्यानमाला सुरू करण्यात आली असल्याची माहिती अमोल भांगरे, महेश गाडेकर, अविनाश गवारी, समिर गारे, अनिल सुपे, दिपक वालकोळी यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गारे यांनी केले,प्रास्ताविक अविनाश गवारी यांनी केले,तर आभार अनिल सुपे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा