Breaking

अ‍ॅटलास कोप्को एम्प्लॉइज फेडरेशन व अ‍ॅटलास कोप्को इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये त्रेवार्षिक वेतनवाढ करार, असा असेल करार


पुणे : पुणे येथील अ‍ॅटलास कोप्को एम्प्लॉइज फेडरेशन व अ‍ॅटलास कोप्को इंडिया लिमिटेड (Atlas Copco India Ltd) या दोन्ही उभयपक्षामध्ये त्रैवार्षिक वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला. खालील बाबींनुसार करार करण्यात आला.


१. वेतन करार आर्थिक तपशील संदर्भात

● वेतन करारात कालावधी - सदर वेतन करार हा दि.१ जानेवारी २०२१ ते दि.३१ डिसेंबर २०२३ असा तीन वर्षाचा राहील. कराराची एकूण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशी वाढ प्रतिमहिना २४,५०८/- असेल.

● पहिल्या वर्षी : रु.१२,२६०/-

● द्वितीय वर्षी : रु.६,३२०/-

● तृतीय वर्षी : रु.५,९२८/-

● सायनिंग बोनस : प्रति महिना रु.२,०००/-

या वेतन कराराच्या अनुसार तीन महिन्यांची बाकी रुपये २९,४३४/- तसेच सायनिंग बोनस प्रति महिना रु.२,०००/- X ३६ महिने = ७२,०००/- असे मिळून एकूण १,०१,४३४/- येणाऱ्या पगारामध्ये मिळणार.

२. व्हेरिएबल कॉम्पेन्सेशन ( VC)

VC च्या नावा मध्ये बदल करून आता ते प्रोडक्शन अलाउंस करण्यात येणार आहे. सदर करारा अनुसार मिळालेल्या वाढ मधून एकही रुपया उत्पादन निगडीत रकमेमध्ये टाकण्यात आलेला नाही. तसेच VC हा महिना ९०% व वार्षिक १०% असा पूर्वीप्रमाणेच असेल. त्याच प्रमाणे सर्वांना म्हणजेच दापोडी, चाकण सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा VC सारखाच असणार आहे.

ह्यामुळे चाकण सभासदांना मिळत असलेला १,६९,२७०/-VC आता रुपये १,४५,८७०/- होणार आहे. त्यामुळे त्यामधील फरकाची रक्कम २३,४००/- म्हणजेच प्रति महिना १,९५०/- HAA अलाउन्स मध्ये कायम (FIXED) केली आहे. 

दापोडी मधील सर्व महिला सभासदांचा असलेला VC हा सुद्धा रुपये १,४५,८७०/- होणार आहे त्यामुळे त्यामधील असणारा फरक हा ४०% FDA मध्ये बाकी HAA मध्ये कायम (FIXED) करण्यात आला आहे.आता पर पॉईंट रेट हा मान्य केलेल्या बेस्ट पॉईंट च्या पुढील पाच पॉइंटला प्रत्येकी ३००/- ( ईफीसीएनसी पॉइंटला १५०/-+ डिव्हिजनल पॉइंटला १५०/-) मिळणार आहे. त्यापुढील पाच पॉइंटला प्रत्येकी [फीसीएनसी पॉइंटला पुढे प्रत्येकी ५००/- ( विकी सीएनसी पॉइंटला २५०/- रुपये+ डिव्हिजनल पॉइंटला २५०/-) मिळणार आहे. सदर रक्कम ही वरील एकूण दाखवलेली वाढ रुपये २४,५०८/- मध्ये धरली गेलेली नाही.

३. कामगार प्रशिक्षण बाबत

कामगार प्रशिक्षण व त्याबाबतची सहल यासाठी आता प्रत्येक सहभागी सभासदास ३,५००/- ऐवजी ७,०००/- मिळणार. त्याचप्रमाणे सहलीचे नियोजन करण्याकरिता ACEF चे दोन प्रतिनिधी ना ऑनड्युटी TE पॉलिसी प्रमाणे मिळणार.

४. निवृत्त होणाऱ्या कामगारांच्या सोयीसुविधा मधील वाढ

निवृत्त होत असलेल्या कामगार कर्मचारी यांना आता रुपये ५,०००/- ऐवजी रुपये १०,०००/- मेडिकल चेक अपसाठी पती/पत्नी यांना मिळतील. त्याचप्रमाणे निवृत्त होत असलेल्या कामगार कर्मचारी यांना निवृत्त होत असलेल्या वर्षी स्पेशल कॉम्प्युटन्सी ग्रेड( तीन वार्षिक इन्क्रिमेंट) मिळतील.

त्याचप्रमाणे कंपनीमधील कोणताही कामगार कर्मचारी निवृत्त होत असताना निवृत्तीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्त होईल. सदर फायदा हा एकूण १४० कामगार कर्मचारी यांना मिळणार आहे.
त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा ही दोन वर्षाने वाढवण्यात आलेली असून त्यामध्ये एकूण चार भाग केलेले आहेत सदर कामगार व कर्मचाऱ्यास निवृत्तीची वाढ देत असताना संपूर्ण निर्णय हा व्यवस्थापनाचा असेल.

त्याचप्रमाणे नुकतेच सर्विस अवॉर्ड चालू करण्यात आलेले आहेत त्यानुसार निवृत्त होत असताना जर सदर कामगार व कर्मचाऱ्यास पूर्ण वर्ष होत नसेल तर त्यास पूर्ण झालेल्या वर्षानुसार निवृत्त होताना सदर रक्कम दिली जाईल. त्याचप्रमाणे निवृत्त होत असताना रुपये पाच लाख स्पेशल ग्रॅज्युएटी म्हणून देण्याचे मान्य करण्यात आलेले आहे यासाठी सेवेची वीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे.

५. इतर बदल

वार्षिक इन्क्रिमेंट आता बेसिक नुसार न रहाता ते ग्रेड नुसार राहील. आता पूर्वीप्रमाणेच प्रमोशन ग्रेड मिळताना पुढील ग्रेड रचनेतील तीन इन्क्रिमेंट व सीनियरअंटी ग्रेडेशन मिळताना पुढील ग्रेड रचनेतील कामगारांसाठी दोन व स्टाफ साठी तीन इन्क्रिमेंट पुन्हा चालू करण्यात आहेत. त्याचप्रमाणे सर्व कामगारांचे पद हे 'टेक्नॉलॉजिस्ट' करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वार्षिक सर्विस इन्क्रिमेंट कंपनी मध्ये झालेल्या प्रत्येक वर्षाच्या सेवेला रुपये ५०/- सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच ज्या सभासदांना सध्या मिळत असलेला मेडिकल अलाउंस  मासिक रुपये ८३३/- आता पुढे १,२५०/- करण्यात आला आहे.

६.भत्या मधील वाढ

जेवण फक्त आता रुपये ७०/- ऐवजी १७०/- मिळणार आहे. ओव्हर टाईम अलावूनस रुपये ५०/- ऐवजी आता १२५/- रुपये मिळणार आहे. नाईट शिफ्ट अलाउंस हा रुपये १३/- ऐवजी २५/- रुपये मिळणार आहे. मासिक हजेरी बोनस हा प्रत्येक महिन्यास १२०/- रुपये मिळणार आहे. नवीन HOUSE HOLD ALLOWANCE (HHH) चालू करण्यात आला असून त्याचा फायदा इन्कम टॅक्स सूट मिळण्यास होणार आहे.

७.आर्थिक सहाय्य निधीमध्ये होणाऱ्या वाढीबाबत

या वर्षापासून क्रेडिट सोसायटीस रुपये २०,००,०००/- (वीस लाख) ऐवजी ३०,००,०००/- (तीस लाख) करण्यात आले आहे. याचा फायदा लाभांश वाढण्यासाठी निश्चित होईल. त्याचप्रमाणे वैयक्तिक तातडीच्या मेडिकल ऍडव्हान्स रुपये ५०,०००/- करण्यात आलेले असून त्याची रिकव्हरी ही समान पाच हप्त्यात केली जाणार आहे. त्याच प्रमाणे कामगार व कर्मचाऱ्यांच्याआई-वडिलांच्या साठीच्या असणाऱ्या मेडिकल स्कीम साठी वर्षाकाठी रुपये ५,०००/- आर्थिक सहाय्य सन २०२२ पासून सुरू करण्यात आलेले आहे.

८. सेवाजेष्ठता सन्मान योजना

या वर्षापासून नवीन सेवा जेष्ठता योजना चालू करण्यात आलेली असून सदर योजना ही कंपनीतील सर्व कामगार कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी समान असेल. यामध्ये प्रत्येक वर्षाला एक हजार याप्रमाणे हे आता ५ वर्ष , १० वर्ष, १५ वर्ष, २० वर्ष, ३० वर्ष, ३५ वर्ष पूर्ण केल्यानंतर सदर सभासदांना मिळणार आहेत तसेच सेवेची पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या कामगार कर्मचाऱ्यांना पाच ग्रॅम ची गोल्ड पिन देण्यात येणार आहे.

तसेच ज्या सभासदांनी वरील तकत्या मधील सेवा पूर्ण केलेली आहे व त्यांना सेवा पूर्ण होऊन पुढील 2.5 कमी वर्ष झालेली आहेत अशा सभासदांना आधीचे लॉंग सर्विस अवॉर्ड मिळणार आहे त्याचप्रमाणे उदा :- एखाद्या व्यक्तीला 1 जानेवारी 2021 रोजी तेरा वर्षे पूर्ण झालेली आहे अशा व्यक्तींना पुढील सेवा पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षाची रक्कम मिळेल.

९. एसीइंएफ सभासदांच्या भविष्याविषयी

पुढील येणाऱ्या वेतन कराराची चर्चा ही सहा महिने आधी सुरू होईल. सभासद संख्या कमी होऊ नये म्हणून नवीन भरती साठी पहिले पाऊल नवीन कामगारांच्या पगाराची रचना विषयी काम पूर्ण झालेले आहे त्याप्रमाणे नवीन कामगारांना कायम करण्यात येऊन त्यांना सभासद करण्यात येईल. त्याचप्रमाणे कायम कामगारांच्या प्रमाणामध्ये किती तात्पुरते कामगार असावेत याविषयी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात येऊन ते प्रमाण ठरविण्यात येईल.
त्याचप्रमाणे ५% Takt Time वाढविन्या संदर्भि ‘टाईम स्टडी’ अनुसार १००% काम लक्षात ठेवून Tact Time ठरविण्यात येईल वा त्यामध्ये बदल करण्यात येईल.

१०  नवीन वेतन करारानुसार मिळणाऱ्या ॲरिअर्स विषयी

वेतन कराराचा ॲरिअर्स म्हणून जानेवारी फेब्रुवारी व मार्च अशा तीन महिन्याचा एकूण पगार २९,४३४/- येणाऱ्या पगारामध्ये मिळणार. तसेच सायनिंग बोनस म्हणून मिळणारा प्रति महिना दोन हजार रुपये एकूण 36 महिन्यासाठी जे रु.७२,०००/-  मिळणार आहेत तेही येणाऱ्या पगारामध्ये मिळणार आहेत
म्हणजेच  २९,४३४/- + ७२,०००/- = १,०१,४३४/- रुपये येणाऱ्या पगारामध्ये मिळणार आहेत.

अ‍ॅटलास कोप्को एम्प्लॉइज फेडरेशन व व्यवस्थापन यांच्यामध्ये झालेल्या वेतन करारावेळी व्यवस्थापनाकडून मॅनेजिंग डायरेक्टर फ्रान्स व्हेन नियेकर्क, जनरल मॅनेजर दापोडी सेबॅस्टियन बीड ओल्ट, जनरल मॅनेजर चाकण हेनरी सोयला, कॉर्पोरेट एच आर मॅनेजर कबीर गायकवाड, एचआर मॅनेजर रिशल गडाख, मॅन्युफॅक्चरिंग हेड दापोडी रुपेशकुमार रामबुड्डी,  मॅन्युफॅक्चरिंग हेड चाकण प्रवीण कुमार फटांगरे त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

अ‍ॅटलास कोप्को एम्प्लॉईज फेडरेशन कडून राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ व अ‍ॅटलास कोप्को एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष शशिकांत पलांडे, जनरल सेक्रेटरी नामदेव शेळके, उपाध्यक्ष सोमनाथ वाघ व राघो निकम, सह सेक्रेटरी प्रकाश वायचळ, खजिनदार भूषण पलांडे, सहखजिनदार शिवाजी येवले त्याचप्रमाणे कमिटी मेंबर ज्ञानेश्वर पाचवे, तुषार थोरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा