Breakingप्राधिकरण गृहप्रकल्पात कष्टकरी कामगारांंना विशेष आरक्षण द्या - कष्टकरी संघर्ष महासंघ


पिंंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याची अट करा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मागणी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगर विकास प्राधिकरणाकडून प्राधिकरणाच्या ग्रह प्रकल्पामध्ये कष्टकरी, श्रमिक कामगार वर्गांसाठी विशेष आरक्षण देण्यात यावे तसेच पात्र लाभार्थी होण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकत्वाची अट असावी अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंशी गवळी यांची कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देऊन ग्रह प्रकल्पाच्या अर्ज व अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, प्रसिद्धीप्रमुख उमेश डोरले, निरंजन लोखंडे, भास्कर राठोड आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणच्या वतीने  पेठ क्रमांक १२ येथे एकूण ३३१७  सदनिकांच्या गृहप्रकल्पांसाठी दि. २७ फेब्रुवारी ते ३० मार्चअखेर अर्ज भरून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र नागरिक व संघटनाने केलेल्या मागणीनुसार आपण ही मुदत वाढवून दि.१८ एप्रिल पर्यंत केली या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

कष्टकरी संघर्ष महासंघ सुमारे १५ वर्षापासून  स्वस्त व परवडनारे घरांची निर्मिती करावी यासाठी निवदने, अंदोलने, मोर्चा च्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. आपण पेठ क्र.१२ मध्ये मोठ्या संखने घरांची योजना होते हे महत्वाचे असुन श्रमिक वर्गाला त्याचे हक्काचे घर मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. गृहप्रकल्पामध्ये सदनिकांची अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये विभागणी केली आहे, गृहप्रकल्पामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि दिव्यांग अशी वर्गवारी करण्यात आली असल्याचे जाहिर केले आहे. इडब्लूएस घटकामध्ये ३३१७ व एलआयजी घटकात १५६६ सदनिका होणार आहेत.

पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत प्रकल्पासाठी कुठल्याही व्यक्तीने कोठूनही अर्ज भरला तरी चालतो त्यामुळे पुणे जिल्ह्यातील श्रमिक वर्ग कष्टकरी वर्ग यांच्यासाठी अन्यायकारक आहे. म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासीच या योजनेसाठी पात्र करण्यात यावा, त्याचबरोबर शहरातील श्रमिक वर्ग गेल्या अनेक वर्षापासून आपल्या प्राधिकरण कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहे. त्याला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे म्हणून प्रयत्नशिल आहे. 

राज्यातील कोणतीही व्यक्ती अर्ज व नागरिक यामध्ये येण्याची शक्यता आणी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती येउन मुळ लाभार्थिवर अतिक्रमण होण्याची असल्यामुळे तेही अर्ज करू शकतील आणि यामुळे जो कष्टकरी वर्ग आहे, श्रमिक वर्ग आहे, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. म्हणून कष्टकरी वर्गांना आपण यामध्ये विशेष आरक्षण ठेवण्यात यावे आणि त्या सदनिका केवळ घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, मजुर, रिक्षावाला, सफाई कामगार आदी असंघटित कामगार कष्टकरी वर्गांसाठी देण्यात यावे, आदी मागण्यावर चार्चा करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा