Breaking

भंडारा : आशा वर्कर यांचे विविध मागण्यांंना घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन


भंडारा : येथील आशा वर्कर संघटनेच्या वतीने विविध मागण्यांंना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


कोरोना कामाचे १ हजार रुपये महिना देण्यात यावे, लसीकरण मोहीम कामाचे २०० रूपये प्रती लाभार्थी द्यावे, शहरी व ग्रामीण आशा वर्कर याना आरोग्य वर्धिनीचे मासिक १ हजार रुपये प्रमाणे १२ महिन्याचे १२ हजार रुपये पीआयपी मध्ये जोडण्याचा निर्णय घेतला नवीन आशा वर्कर यांचे इंडक्षण मोड्युल न झाल्यामुळे वाढीव मानधनाचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे उशीरा प्रशिक्षण झाले तरी पूर्ण लाभ देण्यात येणार, कोरोनाचे काम करणाऱ्या आशा वर्कर यांना हेंड क्लोज, मास्क, सेनिटायजर उपलब्ध करणे, कुष्ठरोग, क्षयरोग मोबदला त्वरित द्यावा,


या मागण्यांबाबत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करुन सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे नेते राजेंद्र साठे यांनी दिली.


तसेच डीएचओ उईके यांनी मागण्या पूर्ण करण्यास ७ दिवसाची वेळ मागितली. वरील लाभ फक्त संघटनेसोबत बांधील असणाऱ्या आशा वर्कर यांना मिळावा असे प्रयत्न केले जाणार असल्याचेही साठे म्हणाले.


निवेदन देतेवेळी राजेंद्र साठे केसर लांगेवार, सोनाली धमगाये उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा