Breaking
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जिल्हाधिकारी यांना वंचित आघाडीचे मलकापूर येथे निवेदन


मलकापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी व जनतेवर लादलेले कडक निर्बंध व जमावबंदी आदेश रद्द करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलडाणा जिल्हा सचिव अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलडाणा यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.


मागील वर्षी कोविड १९ च्या लॉकडाऊनमुळे शासनाने महापुरुषांची जयंतीसाठी परवानगी नाकारून साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन केले होते. तो आदेश मान्य करून जयंती साजरी केली नाही तसेच यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन होणे आवश्यक असल्याचे जिल्हा सचिव अतिशभाई खराटे यांनी म्हंटले आहे.


प्रत्येकाने मास्क वापर करून, शिस्त पाळून, शारीरिक अंतर ठेवून, करोना बाबतीत शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व जणभावनेचा आदर करून शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदन देते वेळी जिल्हा सचिव अतिशभाई खराटे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, जिल्हा सचिव तुळशीराम वाघ, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, ता.नेते संजय दाभाडे, शहराध्यक्ष शेख यासीन कुरेशी, विलास तायडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा