Breaking

सुरगाणा तालुक्यातील भेगु सावरपाडा शाळेचे शिक्षक भास्कर राठोड यांचे कोरोनामुळे निधन


नाशिक (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील भेगु सावरपाडा शाळेचे शिक्षक भास्कर राठोड यांचे कोरोनामुुुळेे निधन झाले. 


त्यांना दि. १५ रोजी नाशिक येथील सिविल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज (दि.२२) रोजी रात्री  १०:०० च्या सुमारास दुःखद निधन झाले. 

ते आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण या संस्थेत अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा भेगु सावरपाडा येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांना सर्व शिक्षक "बाबा" या टोपण नावाने ओळखत. एक आदर्श शिक्षक, क्रीडाशिक्षक, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, उत्तम सभा गाजवणारे, प्रेमळ, हसतमुख व्यक्तिमत्व सर्व कर्मचाऱ्यांचे हक्काचे "बाबा" भावना व्यक्त केली जात आहे. त्यांचा पाश्चात्य पत्नी यशोदा राठोड, मुली विमल, कला, मीनाक्षी, भावना, लक्ष्मी, अर्चना, जावई महेंद्र गावित, मुकेश गावित असा परिवार आहे.

राठोड यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी अत्यंत जवळचा संबंध होता. राठोड यांच्या निधनाचे वृत्त समजताच संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जे. पी. गावित व संस्थेतील सर्व कर्मचारी वर्गाने हळहळ व्यक्त केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा