Breaking


मोठी बातमी : राज्यात लॉकडाउनच्या बाबतीत राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : राज्यातील कोरोना रूग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला.


दरम्यान, या बैठकीत राज्यात सक्तीचा दहा दिवसाच्या लॉकडाऊनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, त्यामुळे येत्या दहा दिवस कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा