Breaking

मोठी बातमी : दहावीच्या परिक्षा संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : कोरोना वाढत्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.


बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली.  या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा