Breaking


मोठी बातमी : प्रशासनाकडून आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली जाहीर !


मुंबई
 : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.


■ वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे : 

१) किराणा दुकाने - सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

३) भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

५) अंडी, मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.

९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार या बाबींचे जनतेने पालन करावे.

इतर बाबी पुढीलप्रमाणे : 

◆ हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.

◆ धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.

◆ आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.

◆ भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.

◆ दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.

◆ टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.

◆ चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

◆ दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.

◆ सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

◆ कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.

◆ शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.

◆ स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.

◆ विवाह समारंभास बंदी राहील.

◆ चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.

◆ अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

◆ सिनेमाहॉल,नाट्यगृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.

◆ सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

◆ सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.

◆ सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.

◆ व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.

◆ बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा