Breaking

मोठी बातमी : नागपूरमध्ये कोव्हीड केअर हॉस्पिटलला आग


नागपूर : नागपूर शहरातील वाडी येथील वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. साधारणत  8.45 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 


आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती. रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र, या आगीच्या धुरामुळे चार रुग्णांना त्रास झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थली कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. या रुग्णालयात एकूण 28 रुग्ण दाखल होते आणि त्यापैकी 10 रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यासोबतच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा