Breakingमोठी बातमी : दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री


मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचेच नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती. मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे.


राजकीय कारकीर्द -

* १९९० ते आजवर (२०२१ साल) - विधानसभा सदस्य, आंबेगाव तालुका, जिल्हा पुणे.

* वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग,कामगार, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे मंत्री पदी कामकाज.

* संचालक - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

* चेअरमन - अंदाज समिती, महाराष्ट्र शासन.

* संस्थापक अध्यक्ष - भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि., पारगाव तर्फे अवसरी बु. ता. आंबेगाव, जि. पुणे.

* उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार हा सन्मान प्राप्त.

* ७ नोव्हें, २०१५ रोजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड.

* रयत शिक्षण संस्थेत मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड.

* १४ ऑगस्ट २०१७ रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदावर निवड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा