Breaking

मोठी बातमी : राज्यात लॉकडाऊन जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा


मुंंबई
 : राज्यात लॉकडाऊन केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. उद्या (दि. १४) रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.


राज्यात कोरोनाचे संकट तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

जनतेने उस्फुर्तपणे जनतेच्या रक्षणासाठी या निर्णयाला पाठिंबा देण्याचे ही आवहान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात उद्या रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस संचार बंदी 

✳️ उद्यापासून राज्यभरात 144 कलम लागू 

✳️ कोणत्याही व्यक्तीला विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही 

✳️ सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू राहतील 

✳️ अत्यावश्यक सेवेसाठी लोकल आणि बस सेवा सुरू असेल 

✳️ मेडिकल सेवा 24 तास सुरू असेल 

✳️ जनावरांच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय सेवा सुरू राहणार

✳️ पेट्रोल डिझेल पंप सुरू राहणार 

✳️ हॉटेलमधून केवळ होम डिलिव्हरी देता येईल 

✳️ राज्यातील 7 कोटी जनतेला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळणार 

✳️ पुढचा एक महिना शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार 

✳️ बांधकाम क्षेत्रातील अधिकृत कामगारांना 1500 रुपये दिले जाणार 

✳️ नोंदणीकृत घर कामगारांना महिन्याला 1500 रुपये दिले जाणार 

✳️ अधिकृत फेरीवाल्यांना महिन्याला 1500 रुपयांची मदत 

✳️ परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये मदत करणार 

✳️ राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी 3300 कोटी रुपयांची औषधांसाठी तरतूद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा