Breaking

बार्शी तालुक्यातील कोरोना पेशन्‍टसाठी ऑक्‍सीजन, रेमडीसेवर इंजेक्‍शन व कोरोना लसीचे दोन्‍ही डोस वाढवून देण्‍याची भाकपची मागणी


बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोना पेशन्‍टसाठी ऑक्‍सीजन, रेमडीसेवर इंजेक्‍शन व कोरोना लसीचे दोन्‍ही डोस वाढवून देण्‍याची मागणी भारतीय कम्‍युनिस्‍ट पक्षाच्‍या वतिने जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे करण्‍यात आली आहे.


बार्शी तालूका हा उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील काही तालूक्यांच्या जवळचा आहे.  बार्शीत दवाखान्याची संख्या जास्त आहे. त्यामूळे सर्वच ठिकाणचे पेशन्ट येथे येतात, बार्शी तालुक्यातील वाढणारे कोरोनाचे पेशन्ट व बाहेरील पेशन्ट असा ताण आहे, बार्शीत मृतांची संख्या देखील जास्त आहे. अशा परिस्थितीत बार्शी तालुक्याचे लोकप्रतिनीधींनी कोरोना पेशन्टसाठी आॅक्सीजन, रेमडीसेवर इंजेक्शन व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस वाढवून मिळणे गरजेचे झाले असल्याच्या मुद्या उपस्थित केला होता त्या मुद्यांचे भारतीय कम्युनिस्‍ट पक्ष समर्थन करत व बार्शी तालूक्यासाठी तातडीने आॅक्सीजन साठा, रेमडीसवर इंजेक्शनचा कोटा व कोरोना लसीचा पहिला व दुसरा डोस यांचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. 


त्‍याचप्रमाणे कोरोना लसीकरण होत आहे तेथे गैरसोय असल्याने, एक लस घेण्यासाठी तिन ठिकाणी नोंदणी करावी लागत असल्याने लसीकरणा वेळी गर्दी व गोंधळाचे वातावरण आहे यावर तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात हि मागणी देखील भाकपने केली आहे.


निवेदनावर कम्‍युनिस्‍ट पक्षाचे राज्‍य कौन्‍सिल सदस्‍य कॉ. तानाजी ठोंबरे, जिल्‍हा सचिव कॉ. प्रविण मस्‍तुद, अनिरूध्‍द नखाते, काॅ. शौकत शेख यांच्‍या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा