Breaking

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी यांचे कोरोनामुळे निधन


नवी दिल्ली : माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी (34) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. गुडगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर दोन आठवडे उपचार सुरू होते.


या संबंधी कॉ. सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे की, माझ्या मुलाला वाचवण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मी त्या सर्वांचा ऋणी असल्याचे म्हंटले आहे.


दरम्यान, माकपचे महाराष्ट्र राज्य कमिटी आणि अखिल भारतीय किसान सभा आशिष येचुरी यांना भावपूर्ण आदरांजली वहात आहेत आणि कॉ. सीताराम, कॉ. इंद्राणी व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा