Breaking

परिक्षा रद्द केल्या तशा निवडूकाही रद्द करा, केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी


रत्नागिरी : परिक्षा रद्द केल्या तर आता निवडणूकाही रद्द करा, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, देशात रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सह अनेक राज्यांनी कडक लाॅकडाऊन जाहीर केलेला आहे.अनेक राज्यात विद्यार्थ्यांच्या केंंद्रीय स्पर्धा परिक्षा, राज्य स्पर्धा परिक्षा व शालेय परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तरी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू इत्यादी राज्यात विधानसभा सभा निवडणूक प्रचारात कोरोना निर्बंधांची सर्रास पायमल्ली सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. त्याला अपवाद महाराष्ट्र राज्य ही नाही. कारण महाराष्ट्रातही पंढरपूर  मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. अनेक पक्षांचे नेते कोरोनाचे नियम धाब्यावर ठेवून  जाहीर प्रचार करीत आहेत. निवडणूकीत सर्व पक्षीय नेत्यांकडूनही व प्रचारसभेत उपस्थित जनतेकडूनही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. यामुळे आगामी काळात देशाला कोरोनाची मोठी किंमत चुकवावी लागेल. 


कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे रूग्णांची वाढती संख्या बघून शासनाने परिक्षा रद्द केल्या. मंदिर, मस्जिद, गुरूद्वार, सिनेमा हाल इत्यादी अनेक सार्वजनिक ठिकाणे बंद केली आहेत. या बंद मागे कोरोनाची चेन तोडणे हाच मुख्य हेतू होता. 


जनतेने शासनाच्या निर्णयाचा स्वागतच केले होते. परंतु परिक्षा रद्द, सार्वजनिक ठिकाणे बंद आणि लाकडाऊन कालावधीतच निवडणूक प्रचार सभा घेणे, सभेत जनतेची प्रचंड गर्दी असे विचित्र चित्र दिसत आहे. परिक्षा घेतल्यावर कोरोना होणार होता व परिक्षा रद्द केल्यावर कोरोना होणार नाही आणि निवडणूकीच्या गर्दीत कोरोना होणार नाही? असे काही मुख्य कारण आहे आहे का? शासनाला निवडणूक महत्त्वाची वाटते की जनतेचा जीव महत्त्वाचा वाटतो? रोज हजारों कोरोना रूग्ण दगावत आहेत. दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढतच आहेत. म्हणून जनतेच्या जीवाचा विचार करून निवडणूक आयोगाने निवडणूका तात्काळ रद्द कराव्यात. अशी मागणी पावरा यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा