Breaking



चिनोदा चौफुलीला जननायक क्रांतिवीर तंट्या मामा भील यांचे नाव द्या - राजेंद्र पाडवी


नंदुरबार : चिनोदा चौफुलीला तंट्या मामा भील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार तळोदा यांच्याकडे बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र पाडवी, राजू प्रधान भिलिस्थान टायगर सेना, तालुकाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, या देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास महत्त्वाचा आहे. सातपुडा डोंगरातील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजाविरुद्ध प्रखर लढा दिला. त्यात तंट्या मामा भिल्ल यांनी अन्याय करणारे इंग्रज, जमीनदार, सावकार यांच्याविरुद्ध प्रखर लढा देवून सातपुडा पट्ट्यात गरीब लोकांचे व आदिवासींचे संरक्षण केले. सातपुडा पट्ट्यात त्यांना प्रेमाने 'मामा'म्हणत. त्यांच्या वागण्यातून सत्य, न्याय, दया आणि प्रेम ही तत्वे प्रकट होत होती. 

म्हणून तमाम आदिवासींसकट सर्व जनतेच्या भावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आदिवासीबहुल जिल्ह्यातील तमाम जनतेचे रक्षणकर्ते, प्रेरणास्थान, आधारस्तंभ जननायक तंट्या मामा भील यांचे नाव चिनोदा चौफुलीला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा