Breaking

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत स्वत: राहुल गांधी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.


राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाची काही सौम्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर मी चाचणी करून घेतली होती. त्यात मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी या केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा