Breakingपिंपरी चिंचवड : वाढती रुग्ण संख्या पाहता बेडच्या उपलब्धतेवर भर - आयुक्त राजेश पाटीलपिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी बेडची कमतरता नाही. भविष्यातील रुग्णवाढ लक्षात घेता बेडची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पुढील दहा दिवसात ऑक्सिजनयुक्त ३५० आणि व्हेंटिलेटरचे ५२ असे ४०२ बेड उपलब्ध केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.


तसेच जम्बो कोविड केअर सेंटरमध्येही ४०० बेडची उपलब्धता असून पुढचा पंधरवडा महत्वाचा आहे. शहराचा मृत्यूदर ०.५ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.


नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात बेड तयार करत आहोत. थेरगावातील रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्याचे काम सुरु आहे. या रुग्णालयांमध्ये पुढील दहा दिवसात ३५० ऑक्सिजनयुक्त, व्हेंटिलेटरचे ५२ असे ४०२ बेड उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.


शहरात सध्या १७ हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील तीन हजार रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. बाकीचे रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्ण वाढत असले तरी बेडची कमतरता नाही. जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ४०० बेड उपलब्ध आहेत. आयसीयूमध्ये १९, ऑक्सिजनमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरचेही बेड उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरच्या बेडची आवश्यकता असते. वायसीएम रुग्णायातील रुबी हेल्थ केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरचे २७ बेड आहेत. रुबी हेल्थ केअर अधिग्रहित केले जाणार आहे. त्याचा शेवटच्या टप्प्यात वापर केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा