Breaking
जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव


जुन्नर : तालुक्यातील पश्चिम आदिवासी समुदाय हा डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे. गेल्या वर्षी राज्यभरात कोरोनाने कहर केला असतानाही आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु मार्च २०२१ पासून तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कोरोना शिरकाव झालेला आहे. यामध्ये अगदी शेवटच्या टोकाच्या घाटघर गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर केवाडी गावातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


आदिवासी भागातील इंगळून, आपटाळे, हिवरे तर्फे मिन्हेर, चावंड, उंडेखडक, घंगाळदरे, घाटघर, भोईरवाडी, राजूर नं १, राजूर नं २, भोईरवाडी, तांबे, उच्छिल या गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.  


त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा