Breaking

कोरोनाने अडचणीत सापडलेल्या नातेवाईकांची मदतीसाठी सोशल मीडियाकडे धाव....प्रतिनिधी (सुमती डोंगरे) : देशभरात करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना ऑक्सिजन, बेड, प्लाझा, इंजेक्शन यांचा तुटवडा भासू लागला आहे. इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, औषध यांच्या तुटवड्यातून मार्ग कसा काढावा अशा चिंतेत रुग्णांचे नातेवाईक आहेत. अशावेळी सरकारी "हेल्पलाईन" सोबतच अडचणीत आलेले नातेवाईक सोशल मीडियाकडे धाव घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.


नातेवाईकांकडून मदतीसाठी ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप अशा सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. एखाद्या व्यक्तीला प्लाझ्मा, इंजेक्शन ऑक्सिजनची गरज भासल्यास ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप आणि स्टेट्सवर हा संदेश टाकल्यानंतर काहींना त्वरित मदत देखील मिळत आहे. अनोळखी व्यक्तीकडून देखील काहींना मदत मिळते.


सोशल मीडियावर येत असणार्‍या या व्यक्तींना देवदूतची उपमा देखील नातेवाईकांकडून दिली जात आहे.


देशाच्या राजधानीत ऑक्सिजनची परिस्थिती गंभीर होत असताना अडचणीत सापडलेले रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी मोठ्या प्रमाणात ट्विटरवर धाव घेत आहेत.


अशा परिस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निश्चितच सोशल मीडिया हे प्रभावी साधन ठरत आहे तर मदतीचा हात पुढे करणारे व्यक्ती रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देवदूत ठरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा