Breaking

घरकुल योजनेची अनामत रक्कम अर्जदारांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करा - कष्टकरी संघर्ष महासंघ


उपजीविका बंद  झाल्याने सामान्यांना पैशाची चणचणपिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रधान आवास योजनेअंतर्गत सोडतीत नंबर न लागलेल्या  लाभार्थ्यांची सध्या बिकट परिस्थिती असल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन बंद  झाल्यामुळे सध्या अडचणीत सापडलेल्या अर्जदारानां अनामत रक्कम पाच हजार रुपये प्रमाणे २२ कोटी १० लाख रुपये हे  त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, माधुरी जलमुलवार, इरफान चौधरी, महादेव गायकवाड यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

कोरोनामुळे काही निर्बंध कडक निर्णय घ्यावे लागले आहेत. यामुळे श्रमिक कष्टकरी वर्गाची उदरनिर्वाहाचे साधनं सध्या बंद झाली असल्यामुळे या ताळेबंदीचा (ब्रेक दि चैन) फटका सर्वांनाच बसत आहे. अशा स्थितीमध्ये जवळची पुंजी आहे ती संपलेली असल्यामुळे अनेक कष्टक-यांचे हात आणि खिसा रिकामा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अनामत रक्कम सध्या हे सर्व श्रमिक वर्ग व नागरिक अत्यंत संकटात असल्यामुळे त्यांना तातडीने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेंअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मागील वर्षी १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविले होते व त्या अर्जासोबत ५ हजार रूपाचा डीडी जमा करण्यास सांगितले होते. घरकुलसाठी ४७ हजार ८७८ एवढे अर्ज आले त्यापैकी ३ हजार ६६४ अर्ज पात्र केले.

अपात्र केलेल्या नागरिकांची संख्या ४४ हजार २१४ एवढी असून त्यांचे ५ हजार प्रमाणे अनामत रक्कम २२ कोटी १० लाख होते. कष्टकरी वर्ग व समान्य नागरिकांचे पैसे पालिकेकडे पडून आहेत. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुलच्या योजनेसाठी मनपा कडे जमा असलेली अनामत रक्कम तातडीने खात्यावर जमा करावी, म्हणजे या आपत्कालीन परिस्थितीत त्याना दिलासा मिळेल. यासाठी जाचक नियंम व अटी न लावता थेट त्यांचे खात्यावर रक्कम जमा करावी, अशी मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा