Breaking

उबुंटू कल्चर ग्रुप" ची स्थापना, वसुंधरा संवर्धनासाठी उचलणार पाऊल !


पुणे : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून "उबुंटू कल्चर ग्रुप" या पर्यावरणवादी ग्रुपची आज (दि. २२) रोजी स्थापना करण्यात आली.  कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण अभ्यास प्रा श्रेयस कांबळे यांनी भविष्याकडे वाटचाल करण्याचे ध्येय बाळगून घरी करवंदाचे रोप लावून केले. तसेच झाडे कशी लावावीत, रोप कशी तयार करावी लागतात, याची माहिती दिली.


तसेच पर्यावरण अभ्यासक नवनाथ मोरे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, कोरोना महासंकट, वाढत तापमान, होणार पर्यावरणाचा ऱ्हास याचा विचार मानवाने करण्याची गरज व्यक्त केली. तसेण माणूस म्हणून आपण करावयाच्या कृत्याकडे लक्ष वेधले. तसेच सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच जनतेमध्ये हा उपक्रम घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, व सोबत काम करण्याची ग्वाही दिली.

"उबुंटू कल्चर ग्रुप", निरोगी, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी......एक पाऊल आश्वासक आणि निर्भीड भविष्यासाठी....! हे ब्रिद घेऊन "ववृक्ष लागवड व संवर्धन" यासाठी काम करणार आहे, अशी माहिती विलास साबळे यांनी दिली.

तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 2 झाडे लावणे अनिवार्य असणार असून संवर्धन करावे लागणार आहे. या उद्घाटन प्रसंगी अनेक पर्यावरण प्रेमी, वृक्ष, पशु-पक्षी प्रेमी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विलास साबळे यांनी केले. तर नासिर शेख यांनी आभार व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा