Breaking

जीवाची बाजी लावणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या कुटुंबांंना तात्काळ बेड मिळावे - उज्ज्वला पडलवारनांदेड : कोव्हीड महामारित जीवाची बाजी लावून काम करत असलेल्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये तात्काळ बेड मिळावे, अशी मागणी आशा व गट प्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड उज्ज्वला पडलवार यांंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


पडलवार म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील १६०० आशा वर्कर व ८० गटप्रवर्तक आहेत. गेल्या अनेक दिवसापासून घरावर तुळशीपत्र ठेवून गावातील जनतेची काळजी घेत आहेत. गावात फिरून लसी बाबत जनजागृती आणि शासनाचे कामे करण्यासाठी आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना कोरोना संक्रमण झाले तर बेडसाठी फिरावं लागतं आहे. त्यामुळं हे थांबलं पाहिजे. त्यांना जे मानधन मिळते ते वेळेवर दिला पाहिजे, जिल्हा परिषदेने प्रोत्साहन भत्ता चालू केला पाहिजे, अशीही मागणी केली आहे.

तसेच जागतिक महामारीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन व अमंलबजावणी करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या अनेक घटना आमच्या निदर्शनास आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेऊन आशा आणि गटप्रवर्तक यांच्या कुटुंबातील आजारी लोकांसाठी सरकारी दवाखान्यात बेडची व्यवस्था करावी, अशी मागणी उज्वला पडलवार यांंनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा