Breaking
लोक कलाकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे - प्रा.धनंजय भिसे


पिंपरी चिंचवड : शहरात बहुरूपी, भारुडी, पिंगळे, डोंबारी, पोतराज, वैदू, वासुदेव, डोंबारी, साहित्यिक, कलाकार, तमाशा कलावंत, बँड कलाकार तसेच भटक्या समाजाचे जीवन कोरोनामुळे उध्वस्त झाले आहे. हे लोक सर्वात जास्त जनतेच्या संपर्कात असतात, त्याशिवाय त्यांच्या चुली पेटत नाहीत. त्यांना वयाची अट न ठेवता त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी प्रा.धनंजय भिसे संस्थापक/अध्यक्ष मातंग साहित्य परिषद यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे एक निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात असे म्हटले आहे की, वय वर्षे 45 पूर्ण झालेल्या लोकांचे लसीकरण सरकार करत आहे. मात्र ह्या मंडळीचे मोठ्या संख्येने लोकांच्या संपर्कात कार्य असते. या साहित्यिक कलावंतांकडून समाजाच्या सांस्कृतिक विचारांचा प्रसार आणि प्रचार होत असतो. त्यांच्याकडून सांस्कृतिक वारसा जतन होत असतो. हे सर्व लोक सध्या कंगाल आहेत, त्यांची लोककलाकार म्हणून विशेष नोंदणी करून घ्यावी, अशी मागणी प्रा.धनंजय भिसे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा