Breaking
अमेरिकेत उष्णतेने १११ वर्षांचा विक्रम मोडीत काढला


वॉशिंग्टन : अमेरिकेत १२२ वर्षांतील विक्रमी बर्फवृष्टीनंतर आता उष्णतेने १११ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. तापमान ३२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. उकाडा वाढल्याने लोक समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने धावू लागले आहेत. अमेरिकेतील हवामान विभागानुसार अमेरिकेत मार्च-एप्रिलमध्ये तापमान सामान्यपणे २२ ते २५ अंशांदरम्यान असते. परंतु यंदा तापमान ३२ अंशांवर गेले आहे. या वर्षी तापमान तुलनेने ७ अंशांपर्यंत वाढले आहे. सॅन दिएगो येथील राष्ट्रीय हवामान केंद्रातील संशोधक मार्क मीडे म्हणाले, यंदा थंडीत विक्रमी बर्फवृष्टी झाली. परंतु थंडी अचानक संपली. त्यामुळे वसंत ऋतू आला नाही. परंतु उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहे. सॅन दिएगोमध्ये कमाल तापमान ९१ फॅरेनहाइट (सुमारे ३२.७ अंश सेल्सियस) नोंदले गेले. १९१० मध्ये ३१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.


फेब्रुवारीत १२२ वर्षांतील बर्फवृष्टीचा विक्रम


अमेरिकेत ५ फेब्रुवारीला हिमवादळ धडकले होते. यादरम्यान काही भागांत ४-५ फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली होती. तेव्हा १२२ वर्षांचा विक्रम स्थापन केला होता.


जर्मनी, नेदरलँड, फ्रान्स आणि ब्रिटेनमध्ये मार्चमध्ये सर्वात जास्त तापमान अमेरिका हा मार्च महिन्यात तापणारा एकमेव देश नसून यासोबत फ्रान्स, ब्रिटेन, नेदरलँडस आणि जर्मनीमध्ये देखील तापमानात वाढ झाली आहे. बुधवार रोजी नेदरलँडसमध्ये २७.२,  जर्मनी २६, ब्रिटेन २५ आणि फ्रान्समध्ये २६ डिग्री तापमान होते. या देशामध्ये मार्च महिन्यात सरासरी तापमान १८ अंशापर्यंत राहते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा