Breaking
पीएम केअर फंडातून मिळालेल्या 27 नादुरूस्त व्हेंटीलरची चौकशी करा - DYFI


अंंबाजोगाई (बीड) : पी. एम. केअर फंडातून मिळालेल्या 27 नादुरूस्त व्हेंटीलरच्या चौकशी करा, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शिवाजीराव सुक्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जगभर कोरोना महामारीचे संकट सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला आहे. हे कोरोनाचे संकंट कमी करण्यासाठी सरकारने देशभर तुघलकी लॉकडाऊन पर्याय निवडला होता. यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. यानंतर सरकारने पीएम केअर फंड ची स्थापना करून देशभरातील जनतेना, उदयोगपतीना ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सढळ हाताने या फंडात मदत करण्याचे आवाहन केले होते.

जे 27 व्हेंटिलियर नादुरूस्त होते. त्यातील 14 व्हेंटिलियर चालू झालेले आहेत. तसेच ICU मधील रूग्णांना आवश्यक व्हेंटिलियर योग्य पध्दतीने चालू आहेत.
शिवाजीराव सुक्रे, अधिष्ठाता 
   स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय

देशातील देशप्रेमी जनतेने, उदयोगपतीनी कोटयावधी रूपयांची भरभरून मदत केली होती. पंरतु शासनाला जेव्हा प्रत्यक्ष पीएम केअर फंडातून सामान्य जनतेला दिलासा देण्याची वेळ आली, त्यावेळेस मात्र अनेक गैरव्यवहार सामोर आल्याचे दिसत आहे. पीएम केअर फंडातून खर्च झालेली रक्कमेची माहिती मागणारे माहिती अधिकाराला केराची टोपली दाखविण्यात आली. तसेच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास पीएम केअर फंडातून पुरविण्यात आलेली 27 व्हेंटिलियर सुध्दा नादुरूस्त असल्याचे निदर्शनास आले आहे, यावरून सरकारचा रूग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे, असा आरोप डीवायएफआय ने केला आहे. तसेच नादुरुस्त व्हेंटिलेटरची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निवेदन देतेवेळी डीवायएफआयचे जिल्हा कमिटी सदस्य कृष्णा आघाव, सुहास चंदनशिव, तालुका कमिटी सदस्य प्रशांत म्हस्के, जगन्नाथ पाटोळे, विजय मेटे, सचिन टिळक उपस्थित होते.


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा