Breaking




सुशिलकुमार पावरा यांना आंतरराष्ट्रीय मूर्ती (Idol) पुरस्कार


रत्नागिरी : निर्वाण फाऊंडेशन नाशिक, महाराष्ट्र  आयोजित International idol award 2021 (आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार 2021) समाजसेवा क्षेत्रात समाजसेवक सुशीलकुमार पावरा यांना निश्चित करण्यात आला आहे. तसा संदेश पुरस्कार आयोजित निर्वाण फाऊंडेशन नाशिक महाराष्ट्र कडून सुशीलकुमार पावरा यांना आला आहे. आयोजकांनी पावरा यांचे अभिनंदन केले आहे.


सुशीलकुमार पावरा यांची 129 वेळा उपोषण करणारे उपोषण कर्ता, शिक्षक, गायक, नृत्यक, कराटेमॅन, कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल म्हणूनही विशेष ओळख आहे. सध्या सोशल मिडीयावर सुशीलकुमार पावरा यांच्या कामाला अधिक पसंती दर्शवली जात आहे. आदिवासी समाजाच्या वाॅटसप ग्रूपवर, फेजबूक पेजवर सुशीलकुमार पावरा यांना प्रेषक सर्वाधिक पसंत करतात. सुशीलकुमार पावरा यांनी टिक टाॅक -Tik tok वरही आपल्या गायकी व नृत्याने प्रेक्षकांवर छाप पाडली होती. टिक टाक स्टार म्हणून ही त्यांना लोक ओळखू लागले होते.


सुशीलकुमार पावरा यांनी समाजसेवा (social service ) यांनाही क्षेत्रात पुरस्कारासाठी 2 दिवसांपूर्वी नामांकन दाखल केले होते. फक्त एकाच दिवसात सुशीलकुमार पावरा यांना प्रेक्षकांकडून सर्वाधिक लाईक पसंती मिळाली व बायोडाटातील कामाची पसंतीवरून त्यांचा पुरस्कार निश्चीत करण्यात आला आहे. कला, क्रीडा, संगीत, गायन, वादन, नृत्य, शिक्षण, समाजसेवा इत्यादी विविध श्रेञासाठी निर्वाण फाऊंडेशन नाशिक महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मूर्ती पुरस्कार 2021 आयोजित केला होता. 


ब्लॅक लेडी अवार्ड/ पदक/ विशेष प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राष्ट्रीय प्रतिष्ठीत व्यक्तीकडून हा पुरस्कार देऊन सुशीलकुमार पावरा यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुशीलकुमार पावरा यांना हा पुरस्कार निश्चित झाल्याबद्धल आदिवासी बांधव व इतर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुशीलकुमार पावरा यांनी त्यांच्या पुरस्कारासाठी सर्वांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा