Breaking

जुन्नर : आदिवासी भाग होतोय कोरोना हाॅटस्पाॅट


जुन्नर : आदिवासी भागातील कोरोना संख्या दिवसेंदिवस वाढताना लिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी, असे आवहान केले जात आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पुर्व भागातही हीच परिस्थिती पहायला मिळते.


गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे नव्हता


गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे. याला शहराकडून होणारी ये - जा कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आता नागरिक करु लागले आहेत.


लग्नांना वाढती गर्दी ठरतेय कारणीभूत


दोन - तीन महीन्यात बहुतेक आदिवासी भागांमध्ये लगीन सराई चालू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहिर केले असले तरी ग्रामीण भागात लग्नांना गर्दी होत आहे. पोलिस पाटील आणि पोलीस प्रशासनाचा जाणूनबुजून कानाडोळा होत असल्याची चर्चा आहे. 


परंतु लग्नांच्या वाढत्या गर्दीमुळेच ग्रामीण आदिवासी भागात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. वेळेस नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.


सर्वसाधारण आजार अंगावरच काढणार आदिवासी !


आदिवासी भागातील माणूस म्हणजे ओबडधोबड. कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची त्यांची तयारी असते. साधं थंडी, ताप, उलट्या, जुलाब झाले तरीही तो अंगावर काढतो. आजही तिच परिस्थिती आहे. तो साध्या डाॅक्टरांकडे जाऊन जुजबी उपचार करतो आहे. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे.


आदिवासी भागातील घरी विलगिकरण सर्व कुटुंबियांना धोकादायक


आदिवासी भागातील घर ही काय म्हणावी तशी कोरोना विलगिकरण करण्याच्या दृष्टीने योग्यच नाहीत. किंवा सर्वसाधारण ताप, खोकला या आजाराच्या काळातही विलगिकरण करणे शक्य नाही. कारण अपुरी जागा, दोन नाहीतर तीन खोल्या, पाण्याचा अभाव, घरात सात-आठ माणसे, सर्व माणसांचा एकत्रित वावर आणि यामुळे कोरोना वाढण्यास पोषक वातावरण तयार होते आहे. सर्वसाधारण आजार समजून कानाडोळा न करता काळजी उपचार करणे आवश्यक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा