Breaking
जुन्नर : निमगिरी येथे कोरोना लसीकरण मोहीम संपन्न


जुन्नर (पुणे) : तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील निमगिरी येथे आज (दि. ५ एप्रिल) कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.


तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शाम बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. स्वाती सारोक्ते त्यांनी या लसिकरण सत्राचे नियोजन केले होते. 


यावेळी निमगिरी सारख्या दुर्गम भागात 60 वर्षावरील 39 तर 45-59 वर्ष वयोगटातील 57 असे 96 लाभार्थीचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.


कोरोना लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी प्रा.आ.केंद्र मढ चे आरोग्य सहाय्यक बापू जाधव, आरोग्य सेवक ए. बी.पठाण, राजवीर सोनवणे,  आरोग्यसेविका श्रीमती. सी. बी. राठोड, श्रीमती सिमा रेंगडे तसेच गटप्रवर्तक श्रीमती शशिकला लांडे व आशा स्वयंसेविका यांचे योगदान लाभले.


यावेळी ग्रामपंचायत निमगिरी सरपंच सुमन साबळे, खटकाळे-खैरे ग्रामपंचायत सरपंच शकुंतला मोरे व सदस्य तसेच ग्रामपंचयात कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा