Breaking

जुन्नर : सोमतवाडी येथे आदिवासी भागातील नागरिकांसाठी कोव्हीड केअर सेंटर होणार !


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील नागरिकांसाठी सोमतवाडी कन्या आश्रमशाळा येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यासंबंधी आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.


कोरोनाचा प्रादुर्भाव आदिवासी भागात देखील होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना उपचारासाठी ओझर/लेण्याद्री याठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागत आहे. आदिवासी भागातील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यासंबंधी बैठक आज सोमतवाडी कन्या आश्रमशाळा याठिकाणी घेण्यात आली. या बैठकी प्रसंगी या शाळेची पाहणी करुन आमदार अतुल बेनके यांनी पाहणी देखील केली व प्रशासनाला सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, अमोल लांडे, संतोष खैरे, दिलीप गांजाळे, भानुदास बेनके हे बैठकीला उपस्थित होते. तसेच तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे, डॉ.शाम बनकर या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा