Breaking

जुन्नर : वर्षानुवर्षे अंधारात असलेली दरेवाडी होणार अंधारमुक्त !


जुन्नर : तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील देवळे येथील जवळपास चाळीस ते पंचेचाळीस घरे असणारी दरेवाडी वर्षानुवर्षे अंधारात होती. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईट व्यवस्था नसल्यामुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेेेर पोल उभारण्याचे काम सुरु झाल्यामुळे दरेवाडी अंधारमुक्त होणार आहे.


तंत्रज्ञानाच्या युगात लाईट वरती खूप काही अवलंबुन असताना संपूर्ण वस्ती अंधारात असणे हे कुठतरी न पाचणारी गोष्ट होती. स्वातंत्र्याची हजारो वर्षे जाऊनही अनेक खेडी अजूनही अंधारात असल्याचे दिसत आहे.
हा अंधार घालविण्यासाठी देवळे गावातील यंग ब्रिगेडने पुढाकार घेतला. व अखेर विजेचा प्रश्न मार्गी लागला. 

सततच्या पाठपुराव्यामुळे, तसेच तालुक्यातील काही लोक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, यासाठी खुप प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागली, असल्याचेही यंग ब्रिगेडचे अध्यक्ष धनंजय बोऱ्हाडे यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक घरापर्यंत महावितरणची लाईट पोहचेल याची खात्री यंग ब्रिगेडच्या वतीनं देतो असं महाराष्ट्र जणभूमीशी बोलताना यंग ब्रिगेड चे अध्यक्ष धनंजय बो-हाडे म्हणाले.

यंग ब्रिगेड ठरतेय परिवर्तनाची नांदी

देवळे गावातील तरुणांनी पुढे येत यंग ब्रिगेडची स्थापना केली. यंग ब्रिगेड गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कित्येक वर्षे अंधारात चाचपडत असणाऱ्या वस्तील अंधार मुक्त करण्यासाठी आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. तसेच तालुक्याचे आमदार, तसेच लोकप्रतिनिधीं यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा