Breaking

जुन्नर : वंचित बहुजन आघाडी तर्फे गरजू कुटुंबांंना जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप


जुन्नर (पुणे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १३० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच सरकारने लागू केलेल्या १४४ कलमामुळे हातावरचे पोट असलेल्या कूटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये, या हेतूने यावर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक हात मदतीचा....!! हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक भान राखून, जयंतीचा अनावश्यक खर्च टाळून उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील १३० गरीब व होतकरु कूटूंबांना जीवनावश्यक किराणा साहीत्याचे वाटप करण्यात आले.


तालुक्यातील नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे, मंगरुळ, आळेफाटा, बोरी, येडगाव, उदपूर, निमगाव सावा या गावांतील गरजु कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी च्या अध्यक्षा निलमताई खरात, महासचिव पुनम दुधवडे, जिल्हा सचिव गिरीराज वाव्हळ, गणेश वाव्हळ तालुका उपाध्यक्ष संतोष डोळस, फिरोजभाई पटेल, महासचिव सागर जगताप, राजे गृपचे संस्थापक अध्यक्ष जुबेर शेख, वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष विनोद अल्हाट, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आतिश उघडे, अरविंद पंडीत, राकेशभाऊ डोळस, मंदार कोळंबे, संतोष सोनवणे, संदेश वाव्हळ गौतम दुधवडे, सुनिता सोनवणे, नुतन जाधव, प्रा.किशोर चौरे, वसंत भोजने, सचिन भोजने, रविंद्र खरात, अक्षय वाव्हळ, गणेश वाव्हळ, संतोष जावळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

       

संपादन - शिवाजी लोखंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा