Breaking

जुन्नर : प्रा. डॉ. राहुल पंडित यांच्या निधनाने श्री शिव छत्रपती महाविद्यालयावर शोककळा


जुन्नर : जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राहुल पंडित (वय ४३) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. डॉ. पंडित यांच्या निधनाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.


डॉ. पंडित हे हिंगोली जिल्ह्यातील होते तसेच ते श्री शिव छत्रपती महाविद्यालयात राज्यशास्त्र या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


डॉ. पंडित यांचे व्यक्तिमत्त्व मनमिळावू आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे असल्याने ते विद्यार्थ्यांना खुप जवळचे वाटायचे. त्याच्या अशा जाण्यावर विश्वास बसत नसल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहे. तसेच त्यांचा नेहमी पुरोगामी चळवळीला खंबीर पाठिंबा होता त्यामुळे त्यांच्या जाण्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

1 टिप्पणी: