Breaking

जुन्नर : देवळे गावात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद


जुन्नर (सचिन घुटे) : राज्यभरात करोना लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील देवळे गावात ४५ वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी देवळे गावातील दरेवाडी, चिंचेचीवाडी, घोटमाळ, शेवतेचीवाडी मधील सुमारे २१५ पेक्षा अधिक लोकांनी या लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला.

 


यावेळी डॉ. अजय जोगदंड, आरोग्य सहाय्यक शिवाजी सानप, आरोग्य सेविका मुल्ला मैडम, आरोग्य सेवक राऊत, शिक्षक अक्षय रोंडे, आशा पर्यवेक्षिका मिरा कुडेकर, आशा सेविका ममता शेळके, प्राथमिक शिक्षक गुणवंत केदारी, सामुदाय आरोग्य अधिकारी गणेश मुंढे, माजी सरपंच छगन घुटे, विठ्ठल बोऱ्हाडे, पोलिस पाटिल देवराम घुटे, सामाजिक कार्यकर्त मोहन बोऱ्हाडे, ग्रा. सदस्य अनंता बोरहादे, चिंचेचीवाडी पोलिस पाटील शशिकला बोऱ्हाडे, ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब उपस्थित होते.


ही लसीकरण मोहिम यशस्वी पार पाडण्यासाठी यंग ब्रिगेड देवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा