Breaking

जुन्नर : देवळे गावातील घरकुल योजनेतील काळा बाजार थांबवा - संतोष बोऱ्हाडे


जुन्नर (पुणे) : देवळे गावातील घरकुल योजनेत काळा बाजार होत असल्याचा आरोप मनसेचे संतोष मारुती बोऱ्हाडे यांनी केला आहे. तसेच तो काळा बाजार त्वरित थांबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

 
संतोष बोऱ्हाडे म्हटले की, देवळे गावातील घरकुल योजनेत काही लाभार्थ्यांना घरे मंजूर झाले आहे तर काही लोकांची अ.ब.क. या यादीत परत डब्बल नावे आली आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे. ज्या लाभार्थ्यांना खरचं घरकुलाची गरज आहे, अशा लोकांना ही घरांचा लाभ भेटायला पाहिजे.ह्या गोष्टीकडे गावातील लोकप्रतिनिधींंनी बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे ही ते म्हणाले.

काही लाभार्थ्यांची यादीत डब्बल नावे कशी काय आली आणि याचा अर्थ लोकांनी काय समजावे, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच लोकांना खरचं घराची गरज आहे, अशा लोकांना लाभ देण्याची गरज आहे. अशा लोकांना १००% लाभ द्यावा, कोणतेही राजकारण नको, असेही ते म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा