Breaking
जुन्नर : आदिवासी नेते चंदर शिंगाडे यांचे दु:खद निधन !


जुन्नर
 : घाटघर गावातील आदिवासी नेते चंदर शिंगाडे यांचे आज (दि. ९ एप्रिल) कोरोना संसर्गामुळे दु:खद निधन झाले.

 
चंदर शिंगाडे यांनी घाटघर गावचे दोन वेळा सरपंच पदाचा कारभार यशस्वीपणे केला. ते विद्यामान सदस्य म्हणून कार्यरत होते. आपले विचार प्रखरतेने मांडणारे व्यक्तीमत्व अशी तालुक्यातील राजकारण व समाजकारणात एक वेगळी ओळख होती. 

नेहरू सादरा त्यावर जॅकेट, डोक्यावर मंचरी टोपी, धोतर, कपाळाला गंध, रुबाबदार दाढी असा पेहराव परिदान करत. नेहमी आदिवासी समाजाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. राष्ट्रवादीचे खंदे समर्थक असणारे चंदर शिंगाडे यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत शिवसेना जाहीर पाठिंबा दिला होता.

शिंगाडे यांच्या जाण्याने आदिवासी समाजातून आणि घाटघर ग्रामस्थांमधून दु:खद भावना व्यक्त केल्या जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा