Breakingइंडोनेशियामध्ये महापुराचे थैमान; 50 जणांचा मृत्यू


इंडोनेशिया : पूर आणि भूस्खलनामुळे इंडोनेशिया आणि तिमोर लेस्टमध्ये आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला आहे. पूर्व इंडोनेशियात आणि शेजारील तिमोर लेस्ट परिसरात यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं आपात्कालीन यंत्रणांनी सांगितलं.


चार उपजिल्हे आणि सात गाव पुराच्या केंद्रस्थानी आहे, असं इंडोनेशिया डिझॅस्टर मिटिगेशन एजन्सीचे प्रवक्ते रादित्य जाती यांनी सांगितलं. 27 लोक बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं.

इस्ट फ्लोअर्स भागात 60 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र इंडोनेशियाच्या राष्ट्रीय यंत्रणांनी याला दुजोरा दिलेला नाही. तिमोर लेस्ट भागात 11 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. भूस्खलन आणि पुराचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, असं आपात्कालीन यंत्रणेनं सांगितलं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा