Breaking

मोठी दुर्घटना : कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यूवसई : पालघर जिल्ह्यातील विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागली. विरारच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 


एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी आय़सीयूमध्ये १७ रुग्ण होते. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई-विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे. या रुग्णालयात एकूण कोरोनाचे ९० रुग्ण उपचार घेत होते.


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील नाशिकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा