Breaking

नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तर्फे लेनिन यांची जयंती साजरी !


नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज कोरोना संकटामुळे रशियन समाजवादी क्रांतीचे प्रणेते कॉम्रेड लेनिन यांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली. समाजवादी क्रांती मध्ये मानवाच्या मूलभूत गरजा राज्य संस्थेच्या वतीने कशा भागवल्या जातात याचे उदाहरण आजही समाजवादी देश घालून देत आहेत. 


याप्रसंगी बोलताना पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर म्हणाले की काल मार्क्स ने कामगार वर्गीय समाजवादी क्रांतीचे तत्त्व सांगितले होते. ते प्रत्यक्षात उतरवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लेनिन यांनी केले. कोरोना संकटकाळात आजही समाजवादी देशांमध्ये झालेले संक्रमण व मृत्यू तुलनेने अत्यंत कमी आहेत. हेच समाजवादी अर्थव्यवस्थेचे गमक आहे. 

यावेळी मनोहर मुळे, कृणाल सावंत, राजेंद्र साठे, नासिर खान, उस्मान खाँ हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा