Breaking

नाशिक : सुरक्षा रक्षकांची किमान वेतन देण्याची सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांकडे मागणी


सुरगाणा (दौलत चौधरी) : भारतीय कामगार न्याय सभा, सुरक्षा रक्षक / माथाडी कामगार संघटना यांच्याकडून नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक अधिकारी अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील 14 सुरक्षा रक्षक यांनी दिनांक 1 जानेवारी 2019 पासून ते आज पर्यंत मंडळाच्या किमान वेतनानुसार वेतन दिले जात नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये वाढती महागाई यामुळे सुरक्षा रक्षकांना मिळणारे वेतन हे अगदी तुटपुंज म्हणजे 9 हजार 200 रुपये मिळत आहे. या वेतनावर आपली कर्तव्य करतात व घरदार चालवतात.


तर नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील काही सुरक्षा रक्षकांना 11 हजार 300 रुपये इतके वेतन मिळत आहे अशी तफावत का ? असा सवाल करत सुरक्षा रक्षकांनी मंडळाचे सहाय्यक कामगार उपायुक्त तथा अध्यक्ष यांना निवेदन दिले. त्यांनी मंडळाच्या नियमानुसार पुढील वेतन देऊ असे आश्वासन दिले.


निवेदन देतेवेळी भारतीय कामगार न्याय सभा सुरक्षा रक्षक/माथाडी कामगार संघटनेचे अतुल उबाले, रवी पगार, दीपक बनसोडे, संतोष शिंदे, अमोल चंद्रमोरे, राजू काजळे, किरण चंद्रमोरे, एकनाथ टोपले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा