Breaking

न्यूझीलंडमध्ये भारतीय प्रवाशांना नो एन्ट्री


वेलिंग्टन : भारतात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जगभरातही चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे न्यूझीलंडने भारतीयांना देशात प्रवेश बंदी केली आहे. ही प्रवेशबंदी अल्पकाळासाठी असणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी गुरुवारी याची घोषणा केली.


पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी फक्त भारतीयांनाच नव्हे तर भारतात असणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांनाही देशात येण्यास मनाई केली आहे. भारतात वाढत असलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतात वाढत असलेल्या करोना बाधितांच्या आकड्याकडे जगातील अनेक देशांचे विशेषत: विकसनशील देशांचे लक्ष लागले आहे. भारतात वाढत असलेल्या करोनाच्या संसर्गाचा परिणाम लसीकरणावर होण्याची भीती 'गावी' च्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. 'ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सीन अॅण्ड इम्यूनाइजेशन'चे (गावी) सीईओ सेठ बर्कली यांनी एका मुलाखती म्हटले की, भारताकडून जगातील बहुतांशी विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, सध्या भारताला करोनाच्या नव्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारतात लसीकरणाला वेग देण्यात येणार आहे. त्यामुळे भारताकडून इतर देशांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणावर करता येणार नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा