Breaking

नॉर्वे : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; पंतप्रधानांना दीड लाखाचा दंड


ओस्लो : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच दंड ठोठावण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. त्याशिवाय भारतासह काही देशांमध्ये कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरण्याबाबतचे नियम सक्तीचे केले आहेत. मात्र, अनेकजण या नियमांची पायमल्ली करत असल्याचे दिसून येते.मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चक्क पंतप्रधानांनाच पोलिसांनी दंड ठोठावला. नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी फेब्रुवारी महिन्यात आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी एका छोटेखानी पार्टीमध्ये 13 जण उपस्थित होते.


मात्र, नियमांनुसार 10 जणांना परवानगी देण्यात आली होती. सोलबर्ग यांना 20 हजार नॉर्वे क्राउन्स म्हणजे जवळपास 1 लाख 75 हजार 648 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा